Sangli ZP Election : सांगली जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना, राष्ट्रवादीने मांडली भूमिका
Sangli ZP Election : सांगली जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना, राष्ट्रवादीने मांडली भूमिका
Sangli ZP Election Result Winner Candidates : जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वजित कदम यांच्यासारख्या राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेचा निकाल हाती आला आहे. जिल्हा परिषदेच्या 61 तर पंचायत समितीसाठीच्या 122 जागांसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये 69.76 टक्के मतदान झालं. त्यानंतर आता मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेच्या चाव्या कुणाकडे याचा फैसला झाला आहे.
सांगलीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये केवळ एकाच जागेचा फरक दिसतोय. राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे एकूण 30 सदस्य होतात. तर महायुतीकडे 31 म्हणजे बहुमताची संख्या आहे. असं असलं तरी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करणारे माजी खासदार सजय पाटील काय भूमिका घेतात त्यावर सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार हे ठरणार आहे.
सांगली : राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, काँग्रेसचे विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह भाजपच्या नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सांगली जिल्हा परिषदेसाठी 69.76 टक्के मतदान झालं आहे.
जिल्हा परिषदेच्या 61 जागांसाठी 211 उमेदवार तर पंचायत समितीच्या 122 जागांसाठी 340 जण रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी 116 पुरुष तर 95 महिला उमेदवार रिगणात आहेत. तसेच पंचायत समितीसाठी 183 पुरुष आणि 157 महिला उमेदवार उभे आहेत.
अनेकांची प्रतिष्ठा पणाला
सांगली जिल्हा परिषदेमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला तुलनेने यंदाची निवडणूक सोपी असेल अशी चर्चा सुरू होती. असं असलं तरी, दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही जोरदार टक्कर देण्यात आल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीच्या जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, रोहित पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे-त्यांचे मतदारसंघ चांगलेच पिंजून काढल्याचं दिसून आलं. त्यामुळे यंदाची निवडणूक ही चांगलीच चुरशीने झाल्याचं दिसून आलं.
सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागा आणि पंचायत समितीच्या 122 जागांसाठी यंदाची निवडणूक पार पडली. यंदा सांगलीचे जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सत्तेची चावी पुन्हा एकदा महिलेच्या हाती जाणार आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांनी अध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवून महिला उमेदवारांच्या विजयासाठी जोर लावल्याचं दिसून आलं.




















