Zero Hour Navi Mumbai उद्घाटनावेळी विमानतळाला D.B. Patil नाव नाही, दिल्लीची मंजुरी प्रलंबित
Continues below advertisement
नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून सुरू असलेला वाद उद्घाटनाच्या दिवशीही कायम राहिला. विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक जण हे नाव निश्चित झाल्याचे सांगत असले तरी, दिल्लीकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात स्टेजच्या बॅकड्रॉपवर दिबा पाटील यांचे नाव झळकले नाही. या नावासाठी दीर्घकाळ लढा देणारे माजी आमदार बाळाराम पाटील यांना अजूनही हे नाव दिले जाईल असे वाटत नाही. हा संघर्ष अजूनही सुरू असून, दिल्लीच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement