एक्स्प्लोर
Maharashtra Politics: माजी नगरसेविका संगिता गायकवाड ठाकरेंच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश
नाशिकमधील राजकीय वर्तुळात दिवाळीच्या काळात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी पती हेमंत गायकवाड यांच्यासह शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला आहे. 'एक महिला म्हणून कुठेतरी आम्हाला डॉमिनेट करायचं काम केलं आणि त्याच्यामुळेच हा निर्णय घेतला,' अशा शब्दात संगीता गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करत पक्ष सोडण्यामागील मुख्य कारण स्पष्ट केले आहे. मुंबईत 'मातोश्री' येथे हा पक्षप्रवेश पार पडला. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आणि केवळ काही ठराविक नगरसेवकांनाच निधी देत असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्या या पक्षबदलामुळे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















