Nashik Nandgaon Farmers : खराब हवामानामुळे गहू हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Nandgaon Farmers : खराब हवामानामुळे गहू हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव
मागील काही दिवसांपासून वातावरणाने लहरीपणा दाखवल्याने एक प्रकारे रब्बी हंगामातील पिकांसाठी ग्रहणच निर्माण केले आहे..वातावरणात दिवसेंदिवस वेगवेगळा बदल होत असल्याने व अवकाळी पावसाच्या आगमनामुळे पेरलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा व अन्य पिके रोगराईच्या गराड्यात सापडली आहेत..बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगाम वाया जातो की काय ? अशी चिंता शेतकरी वर्गासमोर ' आ ' वासून उभी राहिली आहे..रब्बी हंगामात शेतात गहू, हरभरा व कांद्यासह अन्य पिकांची जोमाने पेरणी केली.मात्र अवकाळी व गारपिट झाली अन् कांद्यासह गहू, हरभरा व अन्य पिके या तडाख्यात उध्वस्त झाली होती.