Nashik Crime: Video व्हायरल करत लोंढे गँगचा बारमध्ये गोळीबार, 9 जणांना अटक
Continues below advertisement
नाशिकच्या सातपूर (Satpur) परिसरातील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून, पोलिसांनी प्रकाश लोंढे (Prakash Londhe) टोळीतील नऊ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 'आज काहीतरी मोठा विषय आहे' या आशयाचा व्हिडिओ गोळीबाराच्या दिवशी लोंढे गँगकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मध्यरात्रीच्या सुमारास एका बारमध्ये खंडणीच्या मागणीसाठी दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. या घटनेत जखमी झालेल्या ग्राहकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला भूषण लोंढे (Bhushan Londhe) आणि त्याचे आठ ते नऊ साथीदार अद्याप फरार आहेत. ज्या बारमध्ये गोळीबार झाला, त्याचे संचालक डॉक्टर संजय शर्मा (Dr. Sanjay Sharma) आणि विपीन पटेल (Vipin Patel) हे देखील फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement