Operation Thunder: 'ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करणार , nagpur पोलीस आयुक्तांचा इशारा । ABP Majha

Continues below advertisement
नागपूर पोलिसांच्या 'ऑपरेशन थंडर' या मोहिमेने शहरातल्या ड्रग्स आणि गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे, तर दुसरीकडे उद्योगपती अझीम प्रेमजी (Azim Premji) यांच्या नावाने बनावट ॲप तयार करून एका उद्योजकाला ७६ लाखांना फसवण्यात आले आहे. 'ड्रग्स रॅकेट पूर्णतः उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,' असा स्पष्ट इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल (Ravinder Kumar Singhal) यांनी दिला आहे. गेल्या आठ महिन्यांत नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत ७५८ ठिकाणी कारवाया करून १००७ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ७ किलो एमडी (MD) आणि ७५४ किलो गांजा असा एकूण ११ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सायबर फसवणुकीच्या दुसऱ्या घटनेत, अझीम प्रेमजी यांच्या नावाच्या बनावट ॲपद्वारे एका उद्योजकाची ७६ लाखांची फसवणूक झाली. ही रक्कम बीडमधील दोन बँक खात्यांमध्ये आणि त्यानंतर शेकडो इतर खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola