एक्स्प्लोर
Farmers' Protest: बच्चू कडू, राजू शेट्टींसह २५०० आंदोलकांवर Nagpur मध्ये गुन्हा दाखल, मोठी कारवाई
नागपूर (Nagpur) मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर (Farmers' Protest) प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह हजारो आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 'आम्हाला तुरुंगात टाका, पण मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमीभाव (MSP) आणि इतर २२ मागण्यांसाठी हे 'महा-एल्गार मोर्चा' आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-44) २४ तासांपेक्षा जास्त काळ रोखून धरल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. बेकायदेशीरपणे महामार्ग अडवणे आणि नागरिकांची गैरसोय करणे या कारणास्तव हिंगणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
बातम्या
विश्व
Advertisement
Advertisement


















