मराठा समाजाला पत्र धाडणाऱ्या नक्षलवाद्यांना मराठा युवा संघाचं प्रत्युत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर : दलाल नेत्यांच्या अमिषाला बळी पडू नका, आमच्यात सामील व्हा; अशी साद नधलवाद्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनात उतरणाऱ्या तरुणांना पत्राच्या माध्यमातून घातली होती. आता या नक्षलवाद्यांच्या पत्राला आता मराठा संघटनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची संविधानावर निष्ठा आहे, मराठा समाज चुकीच्या मार्गावर जाणार नाही, असं मराठा युवा संघानं नक्षलवाद्यांना ठणकावून सांगितलं आहे. मराठा समाजाचं प्रबोधन करणारी पत्रकं काढणारी पत्रकं काढण्याऐवजी नक्षलवाद्यांनी आदिवासी, मागास आणि दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करावं असं आवाहन पत्रकातून करण्यात आलं आहे. शस्त्र खाली टाकून शरणागती पत्कणार असतील, तर त्यांच्या सल्ल्याचा नक्की विचार केला जाईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
आमची संविधानावर निष्ठा आहे. जे भारतीय सैन्याविरोधात काम करतात अशा नक्षलवाद्यांकडून आम्हाला प्रेरणेची, सल्ल्याची गरज नाही. तुमचा सल्ला अनावश्यक आहे. अशा पद्धतीनं परखड भाषेत आता मराठा संघटनांनी नक्षलवाद्यांच्या पत्राला प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या मराठा युवा संघानं बे पत्रक काढलं आहे, त्याचे अध्यक्ष महेश महाडिक एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, "ज्या लोकांनी मराठा समाजाला उद्देशून पत्रक काढलं आहे. ते दहशत निर्माण करणारे लोक आहेत. साधरण आदिवासी लोकांना, पोलिसांना या व्यक्ती टार्गेट करतात आणि संविधानाला मानत नाहीत. अशा लोकांनी आमच्या समर्थनार्थ पत्रक काढलं ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही माध्यमांमधून त्यांना आव्हान करतो की, जर खरचं तुम्हाला पत्रक काढून तुम्हाला समर्थन करायचं असेल, तर तुम्ही या संविधानासमोर शस्त्र टाकून आत्मसमर्थन करावं, लोकशाहीचा मान सन्मान करुन नंतरच मराठा समाजाला समर्थन द्यावं. हेच आमचं त्यांना आव्हान आहे."