एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Bachchu Kadu : 'पोलिसांच्या हाती आता BJP चा झेंडा द्यावा लागेल', बच्चू कडू नागपुरात आक्रमक
नागपुरात शेतकऱ्यांचे 'महाएल्गार' आंदोलन तापले असून, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा (Tractor Morcha) काढण्याच्या तयारीत आहेत, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. 'पोलिसांच्या हाती आता भाजपचा (BJP) झेंडा द्यावा लागेल,' असा थेट आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कमी समजू नये, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात राजू शेट्टी (Raju Shetti), महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि विजय जावंधिया यांसारखे नेतेही सहभागी होणार आहेत. संपूर्ण कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र मंडळाची स्थापना यांसारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. 'शेतीत मरण नाही, धोरणामध्ये मरण आहे,' असे म्हणत, जोपर्यंत सरकारच्या धोरणांमध्ये बदल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सांगली
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement


















