Nagpur Crime : नागपुरात तरुणांना 'कु्त्ता गोळी'चं व्यसन, नशेमुळं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
लॉकडाऊनमुळे नागपुरात मद्यविक्रीवर बंधने आहेत... त्या शिवाय अवैध स्वरूपात मिळणारे अमली पदार्थ ही सध्या नशेखोराना सोप्यारित्या मिळत नाहीये... त्यामुळे नागपुरात काही गुन्हेगार वृत्तीच्या तरुणांनी "कुत्ता गोळी"चे सेवन सुरु केले आहे... या गोळ्या "बेंजोडायझेपाईन" समूहात मोडणाऱ्या औषधी असून गुन्हे जगतात त्यांना "कुत्ता गोळी" अशी ओळख आहे... डॉक्टरांच्या मते या गोळ्या धोकादायक असून त्यांचे जास्त सेवन दुष्कृत्य करण्याची मनातील भीती नाहीशी करते... त्यामुळेच नागपुरात गुन्हेगारांनी दोन हत्या प्रकरणात याच कुत्तागोळीचे सेवन करून भर वस्तीत अनेकांच्या देखत दुसऱ्या टोळीतील गुन्हेगारांना संपविल्याचे समोर आले आहे.. त्यामुळे या कुत्ता गोळीच्या खुल्या विक्रीवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे...
Continues below advertisement