Voter List Row: 'खोटे मतदार लाखांच्या घरात', राष्ट्रवादीचे Jayant Patil यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे (MVA) नेते निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्रमक झाले आहेत. 'खोटे मतदार, बोगस मतदार हे लाखांच्या घरात असल्याचं', राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. मविआच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करून मतदार यादीतील अनेक त्रुटी समोर आणल्या. अस्तित्वात नसलेल्या घरांच्या पत्त्यावर मतदार आहेत आणि दुबार नावे काढण्यासाठी सॉफ्टवेअर वापरावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वगळलेल्या मतदारांचा तपशील संकेतस्थळावर का नाही, असा सवालही मविआने विचारला आहे. निवडणूक आयोगाने दबावातून बाहेर पडून निष्पक्षपणे निवडणुका घ्याव्यात, अशी जोरदार मागणी मविआकडून करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement