एक्स्प्लोर
Sanjay Shirsat on on Satyacha Morcha : मोर्चा राजकीय स्टंट, मुंबईकरांना वेठीस धरणं योग्य नाही
बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चा काढला आहे, ज्यावर सत्ताधारी पक्षाने जोरदार टीका केली आहे. 'महाविकास आघाडी टिकणार नाही, राज साहेबांची झालेली एन्ट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याची संधी आहे', असा थेट दावा या प्रतिक्रियेत करण्यात आला आहे. आघाडीचा हा मोर्चा म्हणजे केवळ एक 'राजकीय स्टंट' असून, बैठकीत सुटू शकणाऱ्या प्रश्नासाठी मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असेही मत मांडण्यात आले. दुसरीकडे, सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंद क्वार्टरमध्ये ५०० हून अधिक मतदार नोंदवल्याचा आरोप भाजपने केल्याने महायुतीतही मतभेद समोर आले आहेत. निवडणूक आयोगाने याद्या साफ करेपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, या आघाडीच्या मागणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, 'चित भी मेरी पट भी मेरी' अशी भूमिका घेऊ नये, असा टोला लगावण्यात आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















