MVA Politics: 'मनसे MVA चा घटक दल आहे का?', शिंदे गटाचे Sanjay Nirupam यांचा थेट सवाल
Continues below advertisement
महाविकास आघाडीमध्ये (MVA) मनसेच्या (MNS) संभाव्य प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. 'महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये मागच्या दरवाजातून मनसेला आतमध्ये घेतलेलं आहेच का?', असा थेट सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊत यांनी काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याने पक्षश्रेष्ठी नाराज झाले आहेत. मात्र, नंतर राऊत यांनी सपकाळ आमचे सहकारी असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मनसेला आघाडीत घेण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले असून, या घडामोडींमुळे आघाडीत मिठाचा खडा पडणार की गोडवा वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement