Manoj Jarange Meet Bacchu Kadu : मनोज जरांगे आंदोलनस्थळी बच्चू कडूंची भेट घेणार
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र आले असून, या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 'उद्धव ठाकरे म्हणजे राजकारणामधला विकृत व्यक्तीमत्व,' अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात १ नोव्हेंबरला होणाऱ्या 'सत्याच्या मोर्चा'ची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे. तत्पूर्वी, राज ठाकरे आज पुन्हा एकदा मेळाव्यातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार आहेत. दुसरीकडे, शेतकरी नेते बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नागपूरला रवाना झाले असून, 'ही अटीतटीची वेळ असून शेतकऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावे' असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement