Satyacha Morcha: मतचोरी विरोधात मविआ-मनसेचा एल्गार, मुंबईत 'सत्याचा मोर्चा' Special Report

Continues below advertisement
मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांनी मतदार याद्यांमधील घोळ आणि मतचोरीच्या (Vote Theft) आरोपांवरून 'सत्याचा मोर्चा' काढला, ज्यात ठाकरे बंधू, उद्धव आणि राज ठाकरे, एकत्र दिसले. एका संतप्त महिला कार्यकर्तीने सरकारला जाब विचारताना म्हटले, 'तुमचे बापचे आहे काय रेल्वे बंद करायला?'. या मोर्चात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळाल्या. मतदार यादीतील १०० वर्षांवरील मतदारांना घेऊन जाण्यासाठी 'यमराज' अवतरले होते, तर काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना 'भावी पंतप्रधान' आणि राज ठाकरेंना 'भावी मुख्यमंत्री' घोषित करणारे बॅनर्स झळकवले. भाजपने 'Anaconda' असल्याचे बॅनरही मोर्चात दिसून आले. या मोर्चाद्वारे मतदार याद्या अद्ययावत करणे आणि दुबार नावे काढून टाकण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola