Voter List Row : निवडणुकांवर शंका उपस्थित करणं हे विरोधकांचं ऐकमेव उद्दिष्ट

Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील (Voter List) त्रुटींवरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S. Chockalingam) यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. 'आम्ही प्रश्न निवडणूक आयोगला विचारलोय आणि जवाब देतात भाजपचे लोक,' असा सवाल दुबेजी यांनी उपस्थित केला. शिष्टमंडळाने मतदार यादीत एकाच पत्त्यावर शेकडो मतदार, बोगस नावे आणि वयातील चुका असे अनेक पुरावे सादर केले. VVPAT शिवाय निवडणुका पारदर्शक होणार नाहीत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात किंवा मतपत्रिकेचा (Ballot papers) वापर करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. याउलट, ही केवळ पराभवाची भीती असून विरोधक आतापासूनच पराभवाचे कारण तयार करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola