Maharashtra Politics: 'तुम्ही निवडणुका कशा घेता?', Raj Thackeray यांचा सवाल; MVA सोबत आयोगाच्या भेटीने भुवया उंचावल्या

Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची (State Election Commission) भेट घेऊन मतदार यादीतील (Voters list) त्रुटींवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. 'निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता?' असा थेट सवाल राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. दोन दिवस चाललेल्या या बैठकांमध्ये मतदार याद्यांमधील घोळ, दुबार नावे आणि परप्रांतीय मतदारांच्या नोंदीसारखे मुद्दे शिष्टमंडळाने उपस्थित केले. या गंभीर आरोपांवरून आज पुन्हा एकदा विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आयोगाला भेटले असून, मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींनंतर महाविकास आघाडी आणि मनसे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola