MVA Lok Sabha Seat Sharing : जागावाटपाबाबत Sanjay Raut यांचा दावा, Wadettiwar यांच्याकडून खंडन

Continues below advertisement

Sanjay Raut on Lok Sabha Elections : नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत (Lok Sabha Seat Sharing) मोठी घोषणा केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट महाराष्ट्रात लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Elections) 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. काँग्रेसच्या (Congress) दिल्लीतील (Delhi) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु, आम्ही 23 जागा लढवणारच, असं संजय राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram