Voter List Scam: मतदान गोपनीय असतं, मतदार कसा गोपनीय असेल? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल
Continues below advertisement
राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार यादीतील गोंधळावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे, तर दुसरीकडे गडचिरोलीत (Gadchiroli) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 'मतदान हे गोपनीय असतं ना? मतदार कसा गोपनीय असेल?', असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा हा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. तर, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आयोग काम करत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. या आरोपांना उत्तर देताना, पराभव स्वीकारा आणि जनतेत जा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना दिला आहे. गडचिरोलीत तब्बल ६० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यात कुख्यात नक्षली नेता सोनू उर्फ भूपती याचा समावेश आहे. याशिवाय, गोंदियाच्या पालकमंत्री पदावरून बाबासाहेब पाटील यांनी प्रकृतीचे कारण देत पद सोडले असून, त्यांच्या जागी इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement