एक्स्प्लोर
Maha Morcha: मविआ आणि मनसेचा संयुक्त 'सत्याचा मोर्चा', 1 नोव्हेंबरला मुंबईत एकत्र येणार.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, महाविकास आघाडी (मविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. हा 'सत्याचा मोर्चा' १ नोव्हेंबर रोजी मुंबईत काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुपारी एक वाजता मरीन लाईन्सपासून मोर्चाला सुरुवात होईल आणि तो आझाद मैदानावर संपेल. या मोर्चाच्या तयारीसाठी मविआ आणि मनसेचे नेते लवकरच आझाद मैदानाची पाहणी करून एकत्रित बैठक घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















