ECI Row: 'निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराविरोधात' MVA-MNS चा 'सत्याचा मोर्चा', परवानगीसाठी बैठक

Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीविरोधात प्रमुख विरोधी पक्षांनी 'सत्याचा मोर्चा' काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चाच्या परवानगीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आझाद मैदान पोलिसांना पत्र लिहिले आहे. 'निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांचा मोर्चा निघणार आहे.' या मोर्चाला होणारी संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता, गिरगाव चौपाटी (Girgaon Chowpatty) आणि फॅशन स्ट्रीट (Fashion Street) या दोन ठिकाणांचा विचार सुरू आहे. यासंदर्भात पुढील नियोजन आणि कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात विरोधी पक्ष पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola