Thackeray Brothers: निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू एकवटले, MVA-MNS ची रणनीती ठरवण्यासाठी बैठक
Continues below advertisement
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असून, निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात रणनीती ठरवणे आणि आयोगाबाबत पुढील भूमिका निश्चित करणे, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षांची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. मतदार यादीतील घोळ आणि आयोगाच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement