Shirdi : साई मंदिराच्या आरतीसाठी मुस्लिम समाजाचा पुढाकार, काकड आरतीचे भोंगे बंद न करण्याची मागणी
abp majha web team
Updated at:
04 May 2022 10:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात मंदिर आणि मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेलं असताना शिर्डीत साई मंदिराच्या आरतीसाठी मुस्लिम समाजानेच पुढाकार घेतल्याचं पाहाय़ला मिळतंय. साईमंदिराची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका अशी मागणी शिर्डीतील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलीय. शिर्डी हे सर्वसमभावाचे प्रतीक आहे अशी भावना मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं. शिर्डीतील जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमुशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लिम समुदायाने साईंची आरती भोंग्यावरून सुरू राहावी म्हणून पोलीस प्रशासनाकडे निवेदन दिलंय..