Sarangi Mahajan vs Munde : 'त्यांची वारसदार होण्याची लायकी नाही'; मुंडे भावा-बहिणीवर घणाघात
Continues below advertisement
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय वारसा हक्कावरून बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'त्यांची तेवढी लायकीपण नाहीये नाव घेण्याचं आणि त्यांचं तेवढं तळागाळाचं राजकारण पण नाहीये', अशा शब्दात सारंगी महाजन यांनी जोरदार टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता आहे, असेही त्या म्हणाल्या. हे बहीण-भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी आणि खंडणी गोळा करण्यासाठी एकत्र आले आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. पाशा पटेल (Pasha Patel) यांच्या फिनिक्स फाऊंडेशनला गोपीनाथरावांनी दिलेली शंभर एकर जमीन हे बळकावत असल्याचा दावाही महाजन यांनी केला आहे. मुंडे यांच्या नावाचा वापर करून हे जनतेला लुटत असल्याचा आरोप करत, या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनता प्रचंड नाराज आहे, असेही महाजन म्हणाल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement