Munde Legacy War: 'भुजबळचे वारस समीर आहेत, हे आम्ही जाहीर केलं तर चालेल का?'; प्रकाश महाजनांचा सवाल
Continues below advertisement
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी मेळाव्यात धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान केल्याने या वादाला तोंड फुटले आहे. 'उद्या जर आम्ही हे जाहीर केलं की भुजबळचे वारस समीर आहेत, तेव्हा त्यांना चालू शकेल का?', असा थेट सवाल करत प्रकाश महाजन यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. भुजबळ यांच्या विधानाला धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा यांनी दुजोरा दिला, 'राजकारणातील वारसा हा पोटाचा नसून विचारांचा असतो,' असे त्या म्हणाल्या. यानंतर, प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार असल्याचे ठामपणे सांगितले आणि मुंडे भाऊ-बहिणींमध्ये मीठाचा खडा न टाकण्याचा सल्ला भुजबळांना दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement