एक्स्प्लोर
Mumbai Fire: 'मेट्रोच्या कामामुळे वारंवार आग लागते', वरळीतील नागरिकांचा गंभीर आरोप; सिलिंडरचा स्फोट
मुंबईच्या (Mumbai) वरळीतील (Worli) महाकाली नगर (Mahakali Nagar) परिसरात झोपडपट्ट्यांना भीषण आग (Slum Fire) लागल्याची घटना घडली आहे. 'मेट्रोच्या कामामुळे याठिकाणी वारंवार आग लागत असल्याच्या तक्रारी' स्थानिक नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. डॉक्टर नारायण हर्डीकर मार्गावर (Dr Narayan Hardikar Marg) रात्री साडेआठच्या सुमारास लागलेल्या या आगीत अंदाजे १२ ते १५ झोपड्या (12-15 Huts) जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीदरम्यान एका सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















