Mumbai Traffic Jam: 'शाळकरी मुलं ८ तास वाहतूक कोंडीत, प्रशासनाचा निर्णय चुकल्याचा आरोप?

Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर (Sharda Ashram Vidyamandir) शाळेची सहल अडकली, ज्यामुळे १७५ विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. 'Higher authorities take the decision, I am just following the orders,' असं हतबल उत्तर शाळेच्या एका शिक्षिकेने प्रतिनिधींशी बोलताना दिले. विरारमधील ग्रेट एस्केप (Great Escape) रिसॉर्टमधून सहलीहून परतणाऱ्या या मुलांना तब्बल आठ तास गाडीतच अडकून राहावे लागले. यावेळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मुलांना बिस्किटे आणि पाणी वाटून मदत केली. गेले तीन दिवस महामार्गावर कोंडीची परिस्थिती असूनही शाळेने सहल रद्द का केली नाही, असा प्रश्न आता पालकांकडून विचारला जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola