Mumbai Rains: नोव्हेंबरमध्येही पावसाचा जोर, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, IMD चा इशारा.

Continues below advertisement
नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी मुंबई (Mumbai) आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईत पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 'बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईमध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल,' असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अनपेक्षित पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी आर्द्रता टिकून आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरील खोल दाब आणि चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. ही परिस्थिती आठवड्याच्या मध्यापर्यंत निवळण्याची शक्यता आहे, त्यानंतर हवामान सामान्य होण्याची अपेक्षा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola