Mumbai Protest Row: 'एकट्या MVA-MNS वरच कारवाई का?', कारवाईनंतर विरोधकांचा संतप्त सवाल

Continues below advertisement
मुंबईत महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) काढलेल्या 'सत्याच्या मोर्चा' प्रकरणी (Satyacha Morcha) आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या (BJP) 'मूक आंदोलनावर' कोणतीही कारवाई झालेली नाही. 'फक्त मनसे आणि महाविकास आघाडीवरच गुन्हा का दाखल झाला?', असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे. परवानगी नसताना मोर्चा काढल्याबद्दल मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, भाजपच्या आंदोलनालाही परवानगी नव्हती, मग त्यांच्यावर कारवाई का नाही, असे म्हणत विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशा अनेक केसेस आमच्यावर आहेत आणि आम्ही त्यांना घाबरत नाही, असेही एका नेत्याने म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola