Sachin Sawant : मेट्रो स्थानकांच्या नामकरणावरून वाद, सरकारवर गंभीर आरोप
Continues below advertisement
मुंबई मेट्रो स्थानकांच्या (Mumbai Metro) नामकरणाच्या धोरणावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने सायन्स सेंटर मेट्रो स्थानकाच्या (Science Centre Metro station) नावातून हेतुपुरस्सर बदल केल्याचा आरोप त्यांनी केला. 'पूर्वी हिंदुत्व आता सनातनच्या नावानं शंख फुकणारे देवस्थानांची नावं देखील विकतायत,' असा थेट हल्लाबोल सचिन सावंत यांनी केला आहे. सिद्धिविनायक (Siddhivinayak) मंदिरासारख्या कोट्यवधी लोकांच्या आस्था असलेल्या ठिकाणाच्या नावाचा लिलाव करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. सिद्धिविनायक स्थानकाप्रमाणेच काळबादेवी (Kalbadevi) आणि शितलादेवी (Shitaladevi) या स्थानकांच्या नावांचाही लिलाव करण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा सावंत यांनी केला. नामकरणामागे सरकारची भूमिका कधीच प्रामाणिक राहिली नाही आणि हा त्यांचा कुटील डाव आहे, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement