Metro Name Row: 'भाजपचं हिंदुत्व कॉर्पोरेट, देवांची-महापुरुषांची नावं विकायला काढली', Congress चा हल्लाबोल

Continues below advertisement
मुंबईत नव्याने सुरू झालेल्या Aqua Line मेट्रो स्थानकांच्या नावांवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड (MP Varsha Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली दादरच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ (Siddhivinayak Temple) आंदोलन करण्यात आले. 'भाजपच्या या कॉर्पोरेट हिंदुत्वाचा आणि पोत्या वनवृत्तीचा विरोध करत आहोत', असं काँग्रेसने म्हटलं आहे. या आंदोलनातून काँग्रेसने भाजपवर (BJP) देवस्थाने आणि राष्ट्रपुरुषांची नावे व्यावसायिक फायद्यासाठी विकत असल्याचा आरोप केला. नेहरू (Nehru) आणि संजय गांधी (Sanjay Gandhi) यांची नावे स्थानकांना न दिल्याने काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनापूर्वी वर्षा गायकवाड आणि सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. याशिवाय, उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola