Hostage Drama: 'आत्महत्या करण्याऐवजी...' म्हणत Video, 17 मुलांना ओलीस धरणारा Rohit Arya अखेर ठार
Continues below advertisement
मुंबईच्या पवई (Powai) भागातील आर.ए. स्टुडिओमध्ये (RA Studio) रोहित आर्य (Rohit Arya) नावाच्या व्यक्तीने तब्बल १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवल्याने शहरात खळबळ उडाली. 'आत्महत्या करण्याऐवजी, मी एक योजना आखली आणि काही मुलांना ओलीस ठेवलं आहे,' असं त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ऑडिशनच्या बहाण्याने मुलांना बोलावून त्याने हे नाट्य घडवले. सुमारे तीन तास चाललेल्या या थरारनाट्यानंतर, पोलिसांनी बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र, कारवाईदरम्यान गोळी लागल्याने जखमी झालेल्या रोहित आर्यचा रुग्णालयात मृत्यू झाला. शासनाकडे २ कोटी रुपये थकल्याचा दावा आर्य याने केला होता, मात्र शासनाने हा दावा फेटाळला आहे. घटनास्थळावरून एक एअर गन आणि पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement