Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

Continues below advertisement

Vidyanand Bapat News :  डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

गेल्या काही दिवसांपासून देवी-देवता आणि धार्मिक श्रद्धेविषयी कथित आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. विद्यानंद बापट यांनी नोटीस मिळाल्यापासून 48 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच नमूद वेळेत समाधानकारक खुलासा न झाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पुण्यातील गणेश उत्सवात वाजले जाणारे डीजे साउंड सिस्टिम विरोधात विद्यानंद बापट भूमिका मांडत आहेत. बापट यांची मुलाखत आणि त्यातील काही मुद्दे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल सुद्धा झाले आहेत. दरम्यान, गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी केलेली वक्तव्ये अवमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा नोटिसद्वारे करण्यात आला आहे. ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पिकर, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला विरोध नसल्याचे ॲड. नाईक यांनी त्यांच्या याचिकेत स्पष्ट केले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका नोटीसमधून स्पष्ट करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असे सुद्धा या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola