Special Report Goregaon Fire: गोरेगावमध्ये रॉकेटमुळे मोठी आग, प्रसिद्ध हॉलचं नुकसान

Continues below advertisement
मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) पश्चिमेकडील सरदार वल्लभभाई पटेल हॉलला (Sardar Vallabhbhai Patel Hall) फटाक्यांमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 'क्षणभंगुर आनंदासाठी केली जाणारी ही नस्ती उठाठेव एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते,' अशा शब्दांत बेजबाबदारपणे फटाके उडवणाऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास एक रॉकेट हॉलच्या प्लास्टिक शेडवर पडल्याने आगीचा भडका उडाला. या आगीत हॉलचे मोठे नुकसान झाले असून तो बेचिराख झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा फटाके उडवताना घ्यायच्या काळजीचा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सत्यमसिंग, एबीपी माझा, मुंबई.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola