Mumbai Rains: ऑक्टोबर हीट 'गायब', मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची संततधार, हवामान खात्याचा अंदाज काय?

Continues below advertisement
मुंबईत (Mumbai) ऑक्टोबर हीटऐवजी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस बरसत असून मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. 'यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर हीटच्या ऐवजी पावसाचेच चटके पाहायला मिळाले आहेत,' असे चित्र सध्या मुंबईत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरही पाऊस सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडकडे सरकल्यामुळे विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola