एक्स्प्लोर
Love Affair Murder: १० वर्षांच्या प्रेमाचा भीषण अंत, संशयातून प्रेयसीची हत्या
मुंबईच्या काळाचौकी (Kalachowki) परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत सोनू बरई (Sonu Barai) नावाच्या तरुणाने त्याची एक्स-गर्लफ्रेंड मनिषा यादववर (Manisha Yadav) चाकूने हल्ला करून तिची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रेमसंबंधातून हा हल्ला झाल्याच्या माहितीचा आम्ही तपास करत आहोत'. गेल्या दहा वर्षांपासून सोनू आणि मनिषा यांचे प्रेमसंबंध होते, मात्र दहा दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले होते. मनिषाच्या दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सोनूने हा हल्ला केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पीडित तरुणी जीव वाचवण्यासाठी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये (Aastha Nursing Home) घुसली, पण सोनूने तिथेही तिचा पाठलाग करून हल्ला केला. या हल्ल्यात मनिषा यादवचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर हल्लेखोर सोनू बरईला केईएम रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

















