University Exam : मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 फेब्रुवारीपासून
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 11:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUniversity Exam : मुंबई आणि सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 6 फेब्रुवारीपासून
राज्यातील विद्यापीठ आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन फेब्रुवारीपासून परीक्षा कामाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 2 फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवार, दि. 6 फेब्रुवारी 2023 पासून नियोजित जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर-2022 च्या विद्यापीठ आयोजित परीक्षा दि. 23 जानेवारी 2023 पासून सुरू झाले होते, मात्र महाविद्यालयीन आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलनामुळे दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आले. आता सोमवारपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आधी जाहीर करण्यात आलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपुर यांनी काढले आहे.