Mulund Metro Slab : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Mulund Metro Slab : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
मुंबई - मुलुंड मेट्रो ४ लाईनवर स्लॅब पडून झालेल्या अपघातप्रकरणी लुई बर्जरसह इतर दोन कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सल्लागार कंपनीपैकी एक एलबीजी म्हणजे लुई बर्जर ही कंपनी वादग्रस्त असून या कंपनीविरोधात मोनोरेल प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याचे ताशेरे कॅगने ओढले होते. त्यासोबत देशात इतर ठिकाणी सुद्धा या कंपनी विरोधात तक्रारी दाखल आहेत गुन्हा सुद्धा दाखल आहेत
आजच्या इतर बातम्या -
खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा... ज्येष्ठ अभिनेनात शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टात याचिका... प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा..
मुंबईत कुणाला कामराची हक्कभंग समितीसमोर सुनावणी, एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गीत केल्यानं कारवाई, पुढील सुनावणी १० मार्चला होणार...
अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही, रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप तर तपासही संथगतीनं सुरू असल्याचा दावा...
अल्पसंख्याक प्रमाणपत्रप्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश, उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड, शेणॉय यांची चौकशी होणार
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा,
व्यवहारावर स्वाक्षरी नसल्यानं जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती
तर, व्यवहारासाठी मदत करणाऱ्या दोन सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई
तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी, एबीपी माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा... तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही शिवभक्तांचा व्हिडीओ पोस्ट करून इशारा...


















