एक्स्प्लोर
ST Workers Protest: 'आता नाही तर कधीच नाही', ४ हजार कोटींच्या थकबाकीसाठी कर्मचारी आक्रमक, श्रीरंग बर्गेंचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलन आणि ठाण्यातील ठाकरे सेना (Thackeray Sena) व मनसेच्या (MNS) एकत्रित मोर्चाने राजकारण तापले आहे. यात संजय राऊत (Sanjay Raut), श्रीरंग बर्गे (Shrirang Barge) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे चर्चेत आहेत. 'लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली, ते मिंधे गटाचे हत्थक होते', असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची ४ हजार कोटींची थकबाकी मिळावी, यासाठी कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, 'आता नाही तर कधीच नाही' असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. दुसरीकडे, सोलापुरात 'याल तर तुमच्यासह नाही आलात तर आडवे करू' म्हणत शिवसेनेने भाजपला आव्हान दिले आहे, तर मनसे कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये एका महिलेला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
Advertisement
Advertisement

















