एक्स्प्लोर
Mumbai Water Crisis: 'Gargai, Pinjal धरणं टॉप प्रायोरिटीवर पाहिजेत', खासदार Ravindra Waikar यांची मागणी
मुंबईतील पाणी टंचाईच्या (Water Shortage) समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी दोन नवीन धरणं बांधण्याची मागणी केली आहे. 'गारगाई आणि पिंजाळ हे दोन धरणं टॉप प्रायोरिटीवर लगेच पाहिजेत,' असे वायकर यांनी म्हटले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही जलाशय शंभर टक्के भरले असले तरी, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी, वर्सेवा, दिंडोशी आणि गोरेगावसारख्या भागात पाणी टंचाई जाणवत आहे. वायकर यांच्या मते, एसआरए (SRA) प्रकल्पांमुळे लोकसंख्या दुप्पट होत असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. शहराला सध्या ४२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ ३८५० दशलक्ष लिटर पुरवठा होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गारगाई (Gargai) आणि पिंजाळ (Pinjal) धरण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची गरज असून, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















