एक्स्प्लोर
Amar Kale On Farmers : किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी करणार?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे खासदार अमर काळे यांनी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर जोरदार टीका केली आहे. 'शासनाच्या संवेदनशून्य कारभारामुळे अतिशय थर्ड क्लास पॅकेज हे सरकारकडून मिळालं आहे,' असा थेट आरोप काळे यांनी केला. एक वर्ष होऊनही कर्जमाफी झाली नाही आणि सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सोयाबीनवर (Soyabean) येलो मोझॅक (Yellow Mosaic) रोगाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे कापसाचे (Cotton) उत्पन्न घटले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची अपेक्षा होती, मात्र मिळालेली मदत तोकडी असल्याचा आरोप करत सरकारने शेतकऱ्यांच्या वेदनांवर मीठ चोळले आहे, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















