सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याTop 70 At 7AM 27 Sept 2024
सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याTop 70 At 7AM 27 Sept 2024
महायुतीची आज जागावाटपाची बैठक, ९० जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज चर्चा, कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सपाटा....उद्धव ठाकरे कोल्हापूर, हातकणंगले, सांगली विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार
राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर.. जिल्हाप्रमुखांची घेणार बैठक...विदर्भातून पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल..ठाकरेंची युवासेना आणि अभाविपमध्ये मुख्य लढत..
ठाणे जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार, नवी मुंबईतही पाऊस, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
केंद्र सरकारकडून २४ संसदीय समित्यांवर नावं जाहीर, राहुल गांधी संरक्षण विषयक समितीचे सदस्य, शशी थरूर परराष्ट्र व्यवहार विषयक समितीचे अध्यक्ष
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्षपदी सुनील तटकरेंची वर्णी, सभागृहात चर्चेला येणारे विषय तपासून, अहवाल सादर करणार