MNS Thackeray Alliance | ठाण्यात अविनाश जाधव-राजन विचारेंची एकत्र पत्रकार परिषद
Continues below advertisement
ठाण्यात ठाकरे शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार नेते राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत. ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील प्रश्न आणि ठाण्यातील इतर समस्यांवर ही पत्रकार परिषद केंद्रित असेल. पाच ऑक्टोबर रोजी मनसे, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर मनसेची महाविकास आघाडीत एंट्री होण्याची शक्यता ठाण्यातून वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे शिवसेना आणि मनसे ठाण्यातील विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आंदोलन करत आहेत. या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांकडून एकत्रित माहिती दिली जाईल. 'मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीचा नारळ ठाण्यामधून फुटण्याची शक्यता आहे' ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement