एक्स्प्लोर
Sandeep Deshpande on Congress : मनसेने काँग्रेसकडे कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही- संदीप देशपांडे
पारदर्शक निवडणुकांच्या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार आहे, या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. 'निवडणुका पारदर्शी व्हाव्यात यासाठी आम्ही जाणार आहोत,' असे सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या भेटीवर शिक्कामोर्तब केले. या शिष्टमंडळात सत्ताधारी पक्षांनाही सामील होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला मोर्चासाठी कोणताही औपचारिक प्रस्ताव पाठवला नसल्याचेही त्यांनी म्हटले. छठ पूजेला मनसेचा विरोध नसून, त्यामागे राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नांना विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. ही भूमिका राज ठाकरे यांनी वेळोवेळी स्पष्ट केली असल्याचेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















