Zero Hour : Raj Thackeray मविआ सोबत आल्यास त्यांना हिंदुत्वाची भूमिका सोडावी लागणार - नवनाथ बन

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (UBT) मनसेला (MNS) महाविकास आघाडीत (MVA) सामील करून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, 'राजकीय प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाहीमध्ये देता येत नाहीत,' असे सूचक विधान मनसेच्या नेत्याने केल्याने आघाडीतील सहभागावर सस्पेन्स कायम आहे. या चर्चेत काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे म्हटले आहे, तर महायुतीने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 'नकली चाणक्य' असल्याची टीका करत त्यांच्यामुळेच पूर्वीची महाविकास आघाडी फुटल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात अलीकडे झालेल्या भेटींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola