Voter List Fraud: 'निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार', Raj Thackeray यांचे पॉवरपॉइंट सादरीकरण
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मतदार यादीतील घोळ आणि मतचोरीच्या विरोधात 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. 'राज ठाकरे हे स्वतः पॉवरपॉइंट सादरीकरणातून निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत,' अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता राज ठाकरेही निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर पॉवरपॉइंट सादरीकरण करणार असून वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या मोर्चाला 'सत्याचा मोर्चा' असे नाव देण्यात आले आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मोर्चात उतरणार असून, त्यांनी मोर्चासाठीच्या खास टी-शर्टचे अनावरणही केले. यासंदर्भात त्यांनी पुणे, नाशिक आणि नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मनसेच्या मध्यवर्ती कार्यालय 'राजगड' येथे बैठक घेतली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement