Voter List Row: 'यादीमधल्या त्रुटी 1 नोव्हेंबरला मांडणार', Raj Thackeray यांच्या उपस्थितीत MNS ची शिवतीर्थवर बैठक
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदार यादीतील (Voter List) त्रुटी आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन केले आहे. प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, 'ही सगळी जे आलेले यादीमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या विभाग अध्यक्षांमार्फत केंद्रीय समितीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि केंद्रीय समिती आज या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर ही सगळे मुद्दे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्यात राज ठाकरे सर्वांसमोर मांडणार आहे'. पहिली बैठक 'शिवतीर्थ' येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली, ज्यात मतदार यादी तपासणी आणि १ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनावर चर्चा झाली. दुसरी बैठक संध्याकाळी दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये होणार असून, यात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यासारखे नेते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, मात्र या बैठकीत राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement