एक्स्प्लोर
Raj Thackeray : न भूतो न भविष्यति मोर्चा होईल असं नियोजन करा, राज ठाकरेंचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चासंदर्भात नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. 'गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा,' असे थेट आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीत बोलताना, हा मोर्चा खोट्या मतदारांविरोधात असून तो सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा आरोप करत, हा मोर्चा 'न भूतो न भविष्यति' होईल अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. हा विराट मोर्चा महाविकास आघाडी आणि मनसे संयुक्तपणे काढणार असून, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर यातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















