Satyacha Morcha: 'मतचोराला बाहेर काढा, मास्क घालून कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
Continues below advertisement
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीविरोधात 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात पालघरचे मनसैनिक तुळशी जोशी यांनी लक्ष वेधून घेतले, जे शरीराला काळा रंग लावून 'मतचोर' म्हणून आंदोलनात सामील झाले होते. 'सन्मानेने राजसाहेबांजी ज्या ज्या वेळी कुठलाही आदेश येतो भावनिक असो किंवा खळखट्टय़ असो महाराष्ट्र सैनिक माझ्यासारखे हजारो या महाराष्ट्रात सगळे रस्त्यावर उतरतात,' असे जोशी म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मास्क घातलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रतिकात्मक 'मतचोराला' आसुडाचे फटके मारत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन निवडणूक आयोगाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement