Raj Thakceray : विलास भुमरे यांचं वक्तव्य, राज ठाकरेंचा सवाल

Continues below advertisement
पैठणचे शिवसेना आमदार विलास भुमरे (Vilas Bhumare) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी बाहेरून वीस हजार मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा झाला,' असे खळबळजनक वक्तव्य विलास भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी इशारा करताच, आपल्या मतदारसंघातून स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानासाठी परत आणल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भुमरे यांच्या या विधानामुळे मतदार यादीतील घोळाचा आणि निवडणुकीतील गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola